(दापोली)
जि.प.पू. प्राथ. आदर्श मराठी शाळा कर्दे शाळेतील भूमी सुशील मळेकर हिची शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासह, जवाहर नवोदय विद्यालय राजापूरसाठी निवड झाली आहे. भूमीने घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत120 वा क्रमांक पटकावत दापोली तालुक्यात ग्रामीण भागात १० वा क्रमांक मिळविला असून नवोदय विद्यालयासाठीही तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिष्यवृत्ती भूमीला वैजयंत देवघरकर यांचे मार्गदर्शन लाभले. नुकताच कर्दे शाळेला रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक, २ विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती यादीत झळकले, तर आता नव्याने भूमीची नवोदय विद्यालय निवड, कर्दे शाळा विविध क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार मळगे, शिक्षक सुशांत केळसकर, स्वप्निल परकाळे, शा. व्य. समिती अध्यक्ष दिनेश रुके, उपाध्यक्ष सुशील मळेकर, शिक्षणतज्ञ् सुरेंद्र माने, सदस्य मंगेश मळेकर, रुपेश नागवेकर, मृणाली माने, दामिनी दुसार,अंतरा जाधव, संचिता रहाटवळ, मुग्धा माने, समिधा मिसाळ, पूनम जाधव, मीनाक्षी महाडिक, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, ग्रामसेवक गोरख पवार, केंद्रप्रमुख गुलाबराव गावीत, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे व गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी भूमीचे अभिनंदन केले आहे.