(दापोली / सुदेश तांबे)
पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा आणि विशेष कार्य केल्यामुळे दापोली पोलीस ठाण्यातील अंमलदार अजित गुजर यांची उपनिरीक्षक (ASI) पदी निवड करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून ते आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना पदोन्नती जाहीर झाली आहे.
गुन्हेगारी क्षेत्रातही त्यांची कामगिरी प्रभावी ठरली आहे. दापोलीतील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करणे, अनेकांच्या मदतीला धावून येत जाणे, तालुक्यात एकोप्याचे संबंध निर्माण करणे आदी गोष्टींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
आज दापोली अजित गुजर यांची पोलीस निरीक्षक (ASI) पदी निवड झाल्याने त्यांना सहकारी पोलीस, मित्र परिवार तसेच त्यांच्या चाहत्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पोलीस स्टेशनमध्ये पेढे वाटत आपला आनंद व्यक्त केला. या सन्मानाने दापोली पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, दापोली पोलिस अधिकारी, व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.