(तरवळ / अमित जाधव)
मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. त्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर यांनी स्वागत केले.
प्रशालेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात आज EO मॅडमनी त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक देखील केले. तसेच EO मॅडम यांनी प्रशालेतील प्रशासकीय कामाची माहिती घेतली.
प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये चालणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी करून दिली. तसेच निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या कार्यक्रमाची माहिती घेतली. तसेच विद्यालयातील इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या काम काजा विषयी माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष इयत्ता पाचवी च्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून बोलते केले. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधानही व्यक्त केले.