( गणपतीपुळे / वैभव पवार )
ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी कार्यक्षेत्रात महाराष्ट्र फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पंचम प्रकल्पांतर्गत आयोजित विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबीर महसूल गाव कांबळे लावगण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र फाऊंडेशनचे चेतन वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सतिश थुळ, उपसरपंच चंद्रकांत मालप, ग्रामपंचायत सदस्या प्रणाली मालप, सदस्य अजय काताळे, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, म. गा. तंटामुक्ती समिती अध्यक्ष केशव बलेकर, गावकर प्रकाश मालप, पोलिस पाटील सुहानी बलेकर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय तसेच खाजगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सुरू असलेल्या विविध योजनांची इत्यंभूत माहिती देताना चेतन वाघ बोलत होते. ते म्हणाले की, सत्कोंडीची आदर्श गावाकडे होणारी वाटचाल प्रेरणादायी आहे. यावेळी विविध योजनांची माहिती असलेले क्यू आर कोड असलेले फलक गावातील रहदारीच्या ठिकाणी व शाळेच्या आवारात बसविण्यात आले आहेत. या फलकावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यास आपल्या मोबाईलवर योजनेची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना उपलब्ध होत आहे याचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे सरपंच सतिश थुळ यांनी आवाहन केले. यावेळी सदर फलकांचे अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.