( राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील रेल्वे प्रवाश्याना जर रेल्वे प्रवास करायचा झाला तर राजापूर रेल्वे स्टेशन किंव्हा विलवडे रेल्वे स्टेशनचा पर्याय निवडावा लागतो. पूर्व भागात सौंदळ या गावी रेल्वे स्टेशन आहे, परंतू या ठिकाणी दिवा पेसेंजर (सिंधुदुर्ग एक्सप्रेस)या एकाच गाडीला थांबा असल्याने इतर एक्सप्रेस गाड्यांनी प्रवास करण्यासाठी राजापूर किंवा विलवडे या रेल्वे स्टेशनला जावं लागते, जे ग्रामीण भागातील प्रवाश्यांना खर्चाच्या दृष्टीने न परवडणारे आहे.
याबाबत च्या आणि सौंदळ स्टेशन च्या डेव्हलपमेंट विषयाच्या चर्चेसाठी पाचल तसेच सौंदल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे साहेबांची त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन सौंदळ रेल्वे स्थानकाला एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळावा,स्थानकाची रेल्वे रुळापासून उंची वाढवावी, यासंदर्भात चर्चा केली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी याबाबत लवकरच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून हा विषय हाताळून परिसरातील रेल्वे प्रववाश्यांची अडचण दूर करण्याचा लवकरच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी श्री रवींद्र नागरेकर, युवा नेते अरविंद लांजेकर, कट्टर राणे समर्थक समीर खानविलकर, तळवडे गावचे माजी सरपंच संदीप बारस्कर, मंदार नारकर, निलेश बांदरकर उपस्थित होतें.