(लांजा / वार्ताहर)
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने लांजा तालुका आणि शहर यांच्या वतीने आग्रे हॉल येथे भव्य श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मंगळागौर खेळ, समई नृत्य, जाखाडी नृत्य, टिपरी नृत्य आदींचा समावेश होता.
यामध्ये स्वामी समर्थ ग्रुप भटवाडी, विठलादेवी महिला मंडळ निवोशी, नवयुग सेवा मंडळ आसगे, सखी संगम ग्रुप तळवडे, स्वयंभू ग्रुप खेरवसे, सोमेश्वर जोशी वाडी, कोट, आदिशक्ती ग्रुप लांजा, ब्राम्हण देव महिला मंडळ बेनी बुद्रुक, श्री गणेश महिला मंडळ आंजणारी, साई गणेश महिला मंडळ विलवडे, सावित्री महिला मंडळ शिरवली, नवला देवी ग्रुप इंदवटी, गांगेश्र्वर महिला मंडळ आग्रेवाडी कोट, मल्लिकार्जुन ग्रुप वाघ्रट, भवानी महिला मंडळ विलवडे, धनी रवळनाथ महिला मंडळ कोंड्ये, सत्येश्र्वर महिला मंडळ वनगुळे, शिवकन्या ग्रुप कोलधे, जय भंडारी महिला मंडळ विलवडे, सत्यविनायक गार्डन ग्रुप लांजा, निनकोदेवी प्रसन्न महिला मंडळ खोरनिनको, वनराई मंगळागौर ग्रुप वनगुळे, मांडवकर वाडी महिला मंडळ विलवडे, द्वारका ग्रुप लांजा, शंकर महिला मंडळ कोंड्ये, सुवारे वाडी महिला मंडळ कुरचुंब, डी. जे. सामंत रणरागिणी ग्रुप लांजा, कलिका फुगडी मंडळ कोलधे, सखी संगम ग्रुप आगर वाडी लांजा, महाकाली मंगळागौर ग्रुप कोलधे असे एकूण तीस संघ सहभागी झाले होते.
यामध्ये प्रथम क्रमांक सत्यविनायक गार्डन ग्रुप लांजा, द्वितीय क्रमांक द्वारका ग्रुप लांजा आणि तृतीय क्रमांक श्री सोमेश्वर टिपरी नृत्य कोट हे संघ विजयी झाले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि अशाच प्रकारचे भव्यदिव्य कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात राबवणार आहोत अशी ग्वाही देखील दिली. या श्रावण महोत्सव कार्यक्रमाला तालुक्यातील आणि शहरातील मिळून सुमारे २५०० महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हा महिला प्रमुख शिल्पा ताई सुर्वे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख मानसी आंबेकर, शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, महिला तालुका संघटिका रसिका मेस्त्री, शहर संघटीका प्रणिता बोडस, युवती अधिकारी अनुष्का कातकर, युवती शहराधिकारी दूर्वा भाईशेटे, सर्व नगरसेविका सर्व महिला उपतालुका संघटिका सर्व विभाग संघटिका महिला सर्व उपविभाग संघटिका महिला, सर्व शाखाप्रमुख, महिला सरपंच, शिवसेना विधानसभा क्षेत्र समन्वयक श्रीकांत कांबळे, युवा सेना तालूकाधिकरी राजु धावणे तालुका सचिव वसंत घडशी, शहरप्रमुख सचिन डोंगरकर, युवाशहर अधिकारी प्रसाद भाईशेटे, उपतालुकाप्रमुख सुहास खामकर, दादा पत्की, सुजित आंबेकर, संतोष रेवाळे, विभाग प्रमुख किरण शेरे, अनिल गुरव, संतोष धामणे, प्रवीण शिखरे, दिनेश पवार, संतोष साटले, संतोष धामणे, राकेश पड्यार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.