(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे गावच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला सरपंच सिद्धीका संदीप बोले यांना 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे.
कोंड असुर्डे या ग्रामपंचायतच्या सरपंच सिद्धीका संदीप बोले यांना भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे 15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवश्यक त्या सूचना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने दिले आहेत. त्याचे पालन करून नामनिर्देशीत प्रतिनिधी आणि त्यांचे कुटूंबीय 13 ऑगस्ट 2024 रोजी दिल्ली ला रवाना झाले आहेत.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून सदर प्रतिनिधीना निमंत्रण पत्रे दिले जातील व आज (14 ऑगस्ट रोजी पंचायत राज मंत्रालयाकडून महिलांच्या समस्यांवर कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम सयोजित केले जातील. तर 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला त्या उपस्थित राहतील. सरपंच सिद्धीका बोले यांना दिल्लीतील लाल किल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणुन शासनाकडून मान मिळाल्याने सरपंच सिद्धीका संदीप बोले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.