(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील टेभ्ये गावाचे सरपंच अशोक नागवेकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, गावाच्या विकासासाठी अशोक नागवेकर अनेक वेळा मला भेटले. अशोक नागवेकर यांच्या माध्यमातून टेभ्ये गावाच्या विकासासाठी आज पासून निधी कमी पडणार नसल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. टेभ्ये गावाच्या विकासासाठी कोटी रुपायचा निधी मंजुर करून मी या गावात आलोय. जिल्हा परिषद गटातुन येणाऱ्या निवडणुकीतून धनुष्यबाण या चिन्हाला भरगोस मतदान होईल यात शंका नाही. पालकमंत्री म्हणून आज शब्द देतो अशोक नागवेकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केलाय, त्यांना यापुढे कोणतीही अडचण येणार नाही. आज माझ्या सोबत आलात, आता गावाला विकासाच्या दृष्टीने कायापालट करू असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. राजकारणात संधी येत असते, जात असते मात्र संधीचा लाभ कधी घेऊन हेही लक्षात आले पाहिजे ती संधी अशोक नागवेकर यांनी समजून घेतली आणि आज प्रवेश केला. आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य यांनी पक्ष प्रवेश केला.