(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप ( मुंबई) संचालित श्री.लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप ची इयत्ता सातवी मध्ये शिकणारी कु. सानवी मनीष साळवी हिने उद्योग मंत्री ना. श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त “ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ५० मी.ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सिल्वर मेडल आणि प्रशस्ती पत्र प्राप्त केले आहे.
सानवी हिला विवेक विलणकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आई, वडील, आजी, आजोबा यांचे विशेष प्रोत्साहन मिळाले.जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत यशप्राप्त करणारी सानवी साळवी हिचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.नेत्रा राजेशिर्के यांनी अभिनंदन केले.तसेच संस्था अध्यक्ष श्री. कमलाकर साळवी, सचिव श्री. रितेश साळवी, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रकाश साळवी यांनी सानवी हिचे विशेष कौतुक केले.