( गुहागर )
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्ती कर्मचारी सेवा यांच्या वतीने गुहागर पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संतोष गमरे यांचा अतिउत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला.
कक्ष अधिकारी संतोष गमरे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व कार्यालयीन कर्मचारी शिक्षकांची तत्परतेने वेळेत कामे करून दिल्याबद्दल त्यांच्या विशेष सत्कार करण्याचे संघटनेने नीच्छित केले. यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्ती कर्मचारी सेवा समिती शाखा गुहागरचे जनरल सभेत संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक ३० जून २०२४ रोजी सकाळी दहा वाजता पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह येथे संपन्न झाला.
या विशेष सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीचे राज्य कोषाध्यक्ष विश्वनाथ बेलवलकर, जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा उकार्डे, उपाध्यक्ष गंगाधर जाधव, सहसचिव सिद्धार्थ जाधव, दत्तात्रय गुरव, विश्वास बेलवलकर, शांताराम बेंडल आदी पदाधिकारी उपस्थित होते.