(रत्नागिरी)
संघ स्वयंसेवक विवेक आपटे (वय 56 रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) यांचे आज पहाटे शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. चार वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते, मात्र त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र गेल्या दीड वर्षापूर्वी पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यावर त्यांनी उपचार सुरू केले होते. शारीरिक आजारपणावर मानसिक कणखरतेने त्यांनी आजपर्यंत लढा दिला. दोनच दिवसापूर्वी परकार हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय उपचाराना शरीर साथ देत नसल्याने काल दुपारी घरी त्यांना आणण्यात आले होते.अखेर आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
गेली अनेक वर्षे झाडगाव पटवर्धन वाडी येथे ते राहत होते. त्यानंतर जोशी पाळंद येथे ते कुटुंबासह वास्तवाला होते. आपल्या विद्यार्थी दशेत असल्यापासून ते भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते होते. प्रतिकुल परिस्थिती असतानाही विवेक पुर्णवेळ प्रचारक म्हणून संघाचे काम करीत होते. विवेकचे बाबाही संघ स्वयंसेवक होते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर कालांतराने कुटुंबाची गरज म्हणून विवेक हे भारती शिपयार्ड येथे नोकरीला लागले. मात्र गेली तीन वर्ष दुर्धर आजार असूनही त्यांचे संघ काम सुरूच होत. समर्पित संघ स्वयंसेवकाचा वारसा त्याच्या बांबांकडून म्हणजेच बाळासाहेब आपटेंकडून त्यांनी घेतला होता. आयुष्यभर त्याच समर्पित भावनेने विवेक वागले. विवेक यांनी संघाचा वारसा आपल्या दोन्ही मुलांकडे बालपणापासूनच दिलाय. मनिष, निखिल त्याच समर्पित भावनेतून आज निरपेक्षपणे संघ काम करतायत. आपटेकाकांच्या घरातील तिसरी पिढी आज संघ कामात आहे हे अभिमानास्पद आहे.
विवेक आपटे यांच्या मागे पत्नी विनया व दोन मुले मनीष व निखील आहेत. परमेश्वर विवेक यांचे आत्म्याला चिरशांती देवो व दुःख सोसण्याच बळ त्यांच्या कूटुंबियाना देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.