(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने संगमेश्वर आणि परिसरातील जनता पत्रकार आणि सहकारी पोलिसांच्यावतीने बुके, पुष्पगुछ, शाळ-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत कांबळे यांची पदोन्नती होऊन ते उपनिरीक्षक झाल्याचे समजताच तालुक्यातील विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शूभेच्छांचा आणि सत्काराचा ओघ सुरु होता. प्रतिष्ठित ठेकेदार राकेश चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती दिलीप पेंढारी, सतीशशेठ चाळके, पत्रकार वहाब दळवी, पत्रकार एजाज पटेल, गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, उप निरीक्षक राजेश शेलार, सचिन कामेरकर, किशोर जोशी, स. उप. निरीक्षक तांबडे, सतीश कोलगे, सोमनाथ अव्हाड, क्रांती सावंत, प्रमोद रामपुरे, अनिकेत चव्हाण आदींच्या उपस्थित सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत असलेल्या चंद्रकांत कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने बुके, पुष्पगुच्छ, शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
एक आदर्श व्यक्तिमत्व आणि कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरक्षक सामाजिक कार्यात तत्पर सर्वांना मदत करणारे पोलीस अधिकारी म्हणुन निश्चितच भावी पिढी आपला आदर्श घेतील असे मत सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी पत्रकार एजाज पटेल यांनी व्यक्त केले. तर दिलीप पेंढारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा गौरव फक्त कांबळे साहेब यांचा नसून त्यांच्यामुळे संगमेश्वर पोलीस ठाण्याचा सुद्धा गौरव होऊन पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे बोलताना नक्कीच अपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्तव्य करताना आपणही या समाजाचा एक हिस्सा आहोत व समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतून, कोणाला जर निःस्वार्थ भावनेने मदत करायची असेल तर उजव्या हाताने काय करतोय ते डाव्या हाताला कळायला नको अशा प्रकारे सामाजिक जाणीव ठेऊन गोरगरिबांना मदत करण्यास कांबळे साहेब अग्रस्थानी असल्याचे राकेश चव्हाण यांनी सांगितले.
सत्कार स्वीकारताना सत्कार्मुर्ती चंद्रकांत कांबळे यांनी सत्कार होत असतात, सत्कार होत राहतील परंतु मी ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे त्या ठिकाणी येऊन माझा सत्कार करून माझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करून प्रेम दिले जात आहे, हे माझ्या चिरंतन लक्षात राहील असे भावनिक उदगार काढताना आपसूकच डोळ्यातून आलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. तर पोलीस उपनिरक्षक शंकर नागरगोजे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केलें.