(संगमेश्वर / एजाज पटेल)
विधानसभा मतदारसंघात निवडणुक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलिस व सीआयएसएफ जवानांच्यावतीने तालुक्यातील कोंडीवरे गावात पथसंचलन करण्यात आले. यावेळी अनेक नागरीकांनी पथसंचलन पाहण्यासाठी गर्दी केली होती.
संगमेश्वर पोलिस व सीआयएसएफ जवानांच्यावतीने पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नुकतेच कोंडीवरे गावात पथसंचलन करण्यात आले. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरीकांनी शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवुन पोलिसांना सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात आले. आदर्श आचार संहितेचे सर्वानी पालन करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये तसेच सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकु नये अशा या वेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुक लक्षात घेउन संगमेश्वर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर असुन पोलिसांनी सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे.
कुतुहल अन् उत्सुकता
तालुक्यातील कोंडीवरे गावातील ग्रामपंचायत येथून पोलीस पथसंचलनास सुरुवात करून मोहल्ला, बौद्धवाडी आदी मार्गाने गावात पोलिसांनी केलेल्या पथसंचलनाबाबत नागरीकामधे कुतुहल व उत्सुकता दिसुन आली. अनेक नागरीकांना पथसंचलन कशासाठी काढण्यात आले हे समजले नसल्यामुळे त्यांची उत्सुकता अधिक दिसुन आली.
सदर पथसंचलनात सीआयएसएफ नंबर दोन व तिन चे एक अधिकारी व 48 अंमलदार व स्थानिक पोलीस ठाणे एक अधिकारी पंधरा अंमलदार असे एकूण दोन अधिकारी व 65 अंमलदार सहभागी होते.