(संगमेश्वर)
मौजे अंत्रवली ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील पाणलोट कार्यक्रमात झालेला गैरव्यवहार याविषयी काही महिन्यापूर्वी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली असून पुरावे दाखवून सुद्धा (सापडून सुद्धा) चौकशी अहवाल व अभिप्राय या या मध्ये सर्व प्रकार दडपण्यात आला असल्याची तक्रार पत्रकार संदेश जिमन यांनी पत्रातून केली आहे.
सदर प्रकरणाची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत भ्रष्टाचार मुक्त ‘सुजलाम सुफलाम’ असावा या हेतूने पत्रकार संदेश जिमन यांनी पत्राद्वारे हा विषय सविस्तर आणि तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांना सादर केला असून ही चौकशी पारदर्शीपणे झाली नाही तर १५ ऑगस्ट २०२४ रोजी बेमुदत उपोषणाला बसणार आहे असे कळविण्यात असे आले असून सदर पत्राची प्रत राज्याचे कृषी मंत्री, जिल्हा कृषी अधीक्षक,तहसीलदार, यांना सादर केली असून भारताचे प्रधानमंत्री यांनाही ट्विट केली असल्याचे त्यांनी सांगितले.