(लांजा)
मानधन तत्वावरील स्थानिक शिक्षकांना नवोदित शिक्षक भरतीमध्ये प्रथम प्राधान्य मिळावे आणि त्याच बरोबर इतर मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी १५ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलन रत्नागिरी जिह्या यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
रत्नागिरी येथे दिनांक १५ ऑगस्ट पासून शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. नवोदित शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी शिक्षकानी रत्नागिरी येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलन रत्नागिरी जिल्हा यांनी पूर्णपणे पाठींबा दिला आहे.
आंदोलनाला पाठींबा असल्याचे पत्र आंदोलक शिक्षकांना देताना सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी सावंत, जिल्हा सचिव अमर पवार तसेच स्वप्नील कांबळे, दर्शना निवळकर, आयुष मोगरे, निशांत जाधव, प्रतीक पवार, अस्मी सुर्वे, दिलराज कदम, वंश आयरे, साहिल पवार, पूनम कांबळे, संघरत्न सावंत, राखी मोहिते, अथर्व पवार, आर्यन सावंत, सायली कांबळे, आर्यन मोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.