(चिपळूण)
शरीरास अपायकारक ठरेल अशा प्रकारचे खाद्यपदार्थ व पेयाची विक्री करणाऱ्या येथील प्रौढाला चिपळूण पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. त्याच्याकडून पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असलेला हजारो रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याची दुचाकी व अन्य साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.
कादीर तय्यब मेमन (४१, रा. पेठमाप, हमीद अपार्टमेंट, चिपळूण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विजय जयसिंग पाचुपते (४१, रा. रत्नागिरी) यांनी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास दुचाकी (एमएच ०८, एएम ८१५१) वरून मौजे पेठमाप येथे कादीर तय्यब मेमन पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळला.
त्याच्याकडील हजारो रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास चिपळूण पोलिस तपास करत आहे.