(नवी दिल्ली)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ४ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ ४८.६७ लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. या ४ टक्क्यांच्या वाढीसह महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. १ जानेवारी २०२४ पासून वाढीव डीए लागू होईल. यामुळे वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी सुद्दा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मार्च महिन्याच्या पगारात हा वाढीव भत्ता आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील एरिअर सुद्धा मिळणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या या निर्णयामुळे केंद्र सरकराच्या तिजोरीवर 12,868.72 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली आहे.ऑक्टोबर 2023 च्या अखेरिस डीए 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के इतका करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ करण्यात आल्याने 50 टक्के इतका झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ देशभरातील 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे.
#WATCH | Union Cabinet approves hike in Dearness Allowance to govt employees and Dearness Relief to pensioners by 4% from January 1, 2024, announces Union Minister Piyush Goyal. pic.twitter.com/IsWUnwBGHW
— ANI (@ANI) March 7, 2024
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला १८ हजार रुपये मूळ वेतन (बेसिक-पे) मिळत असेल, तर त्या कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता सध्याच्या ४६ टक्के दराने ८,२८० रुपये मिळतो. त्यात आता ४ टक्के वाढीसह ५० टक्क्यांनुसार मोजले तर महागाई भत्ता ९ हजार रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होईल.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1