(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज NCC विभाग व 2 महाराष्ट्र नेवल युनिट रत्नागिरी मार्फत मालगुंड गायवाडी सागर किनारा स्वच्छता मोहीम दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी राबविण्यात आली. सदर सागर किनारा स्वच्छता मोहीमेमध्ये बळीराम परकर विद्यालयातील NCC विभागाचे सुमारे 50 कॅडेत सहभागी झाले होते, त्यांनी मालगुंड गायवाडी येथील संपूर्ण किनारा स्वच्छ केला, प्रशालेच्या NCC विभागामार्फत या अगोदरही गणपतीपुळे सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली होती, स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये मालगुंड गावचे पोलीस पाटील श्री अमोल राऊत, श्री शशिकांत पवार, उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी कामांडिंग ऑफिसर श्री के राजेश कुमार, मुख्याध्यापक श्री बीपीन परकर, NCC ऑफिसर श्री उमेश केळकर यांनी विशेष सहकार्य केले.