दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 चा फायनल सामना कुवेत आणि भारत यांच्यात झाली. भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करत नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने कुवेतचा पराभव केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकत भारताने saff championship चषकावर नाव कोरले. भारताने 14 वर्षात नवव्यांदा saff championship चषकावर नाव कोरलेय. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने कुवेतचा पराभव करत saff championship चषकावर नाव कोरल्यानंतर चक दे इंडिया आणि वंदे मातरम् आवाजांनी मैदानात चाहत्यांनी आनंद साजरा केला.
भारत आणि कुवेत यांच्यात SAFF चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना बंगळुरु येथे खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. हाफ टाइमपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटने लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने तो जिंकला. भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतीय फुटबॉल संघाने नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिप जिंकली आहे. यापूर्वी, भारतीय संघाने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 मध्ये विजय मिळवला आहे.
2⃣ Successful Penalty Shoouts in a row! INDIA 🇮🇳 ARE THE SAFF CHAMPIONS AGAIN! 🤩
KUW 1⃣-1️⃣ IND
🇰🇼: ❌ ✅ ✅ ✅ ✅ ❌
🇮🇳: ✅ ✅ ✅ ❌ ✅ ✅📺 @FanCode & @ddsportschannel 📱#KUWIND ⚔️ #SAFFChampionship2023 🏆 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/pmm0mT3gcA
— Indian Football Team (@IndianFootball) July 4, 2023
कर्णधार सुनिल छेत्री याने पेनल्टीमध्ये गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. कुवेतनेही जोरदार पुनरामन करत 3-3 अशी लढत दिली होती. पण दबावात भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. विजयाचा हिरो ठरला गोलरक्षक गुरप्रीत संधू. त्याने पेनल्टी वाचवून भारताला चॅम्पियन बनवले. यासह भारत नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचा विजेता ठरला. नियमित वेळेत, इंजरी आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. यानंतर सामना पेनल्टीमध्ये गेला, जिथे भारतीय गोलरक्षक गुरप्रीत संधू अढळपणे उभा राहिला आणि विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि नेपाळला पराभूत केले आणि कुवेतविरुद्ध बरोबरी साधली होती. भारतीय संघाने उपांत्य फेरीत लेबनॉनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता.