(मुंबई)
व्यापार युद्धाची वाढलेली भीती, आरबीआयकडून बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता, कमकुवत देशांतर्गत बाजार आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी यामुळे कमकुवत देशांतर्गत बाजार आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी १४ पैशांनी घसरून ८७.५७ या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. या वर्षी रुपया दोन टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
रुपयाची घसरण
सप्टेंबर २०२२ – ८०.१२
ऑक्टोबर २०२२ – ८४.०७
डिसेंबर २०२४ – ८५.०७
जानेवारी २०२५ – ८६.५८
फेब्रुवारी २०२५ – ८७.५७
देशांतर्गत चलनात ही तीव्र घसरण झाल्यामुळे रुपया सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या आशियाई चलनांपैकी एक बनला आहे. या वर्षात आतापर्यंत रुपया १९३ पैशांनी घसरला आहे. यामुळे कच्च्या तेलासह इतर साहित्य महाग होणार होणार आहे.