(देवरुख / सुरेश सप्रे)
महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ सुभाष बने यांचा नातू कुमार रेयांश पृथा पराग बने याने रोलरस्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) द्वारे आयोजित केलेल्या 34 व्या महाराष्ट्र राज्य रोलरस्केटिंग चॅम्पियनशिप 2024 (वय 7 ते 9 वर्ष) मध्ये रेयांश एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. तो राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा म्हैसूर येथे आयोजित करण्यात येणार आहे,
वयाच्या आठव्या वर्षी स्केटिंग या खेळातील भारताचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मान मिळालेला रेयांश पृथा पराग बने याने एवढ्या वयात एवढी मोठी उंच भरारी घेत बने कुटुंबाचे व भांडूपचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याने वेगवेगळ्या स्तरावर स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन आजपर्यंत वयाच्या आठव्या वर्षीच त्याने २० सुवर्णपदक. ८रौप्यपदक आणि६ कांस्यपदक, अशी एकूण ३४ पदके प्राप्त केली आहेत. आता तो भारताचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून स्केटिंग खेळत आहे.
माजी आमदार डॉ सुभाष बने यांचा नातू असलेला रेयांश भांडूप शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पराग बने व इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स च्या मुख्याध्यापिका सौ.पृथा बने यांचा सुपुत्र आहे.