( मुंबई / सुरेश सप्रे )
मुंबई विरार येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय रोलर अँथलेस्टिक चॅम्पीयन्सशिप स्पर्धेत स्केटिंगमधे रेयांश बने याने दोन सुवर्ण पदकावर नाव कोरत या शालेय स्पर्धैत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.
महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू रेयांश पृथा पराग बने याने रोलर अँथलेस्टिक असोसिएशन महाराष्ट्र व रोलर अँथलेस्टिक फेडरेशन आँफ इंडीया यांनी आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा 2024-25 मध्ये भाग घेते आपला ठसा उमटवला. सदर राष्ट्रीय स्पर्धा अमेय कल्ब, विरार येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रेयांशने दोन सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत.
रेयांश बने हा युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. तो वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रोलर स्केटिंग या खेळाचा सराव करत आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत 96 तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण 10 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत. कू. रेयांश पृथा पराग बने हा यूवा शिवसेना भांडूपचे नेते पराग बने, तसेच श्रीम. पृथा बने पराग इंग्लिश स्कूल भांडूप च्या मुख्याध्यापिका यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व सर्व थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.