( चिपळूण )
शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली गृह राज्यमंत्री (शहरी) योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गुहागर विधानसभा मतदारसंघ खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने धामणंद येथील महालिंग मंदिरात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पंधरागाव विभागातील ग्रामस्थांच्या विविध दाखल्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी ग्रामस्थांच्या विविध दाखल्यासंदर्भात प्रशासन नेहमीच सकारात्मक राहील, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेना गुहागर विधानसभा खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, विभाग प्रमुख सखाराम पालांडे, अनुराध उतेकर, प्रशांत उतेकर, अनिकेत म्हापदी, विष्णू कदम, गजानन पालांडे आदी उपस्थित होते.
शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत ऍग्रीस्ट नोंदणी, पीएम किसान नवीन नोंदणी, अद्यवतीकरण, आधार क्रमांकला मोबाईल क्रमांक लिंक करणे, उत्पन्न दाखला, वारस तपास अर्ज स्वीकृती, दुय्यम रेशन कार्ड काढणे, रेशन कार्डवर नवीन नाव चढवणे व कमी करणे व मयत स्थलांतरित लोकांची रेशन कार्ड करून नाव कमी करणे आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे. याबाबत पंधरागाव विभागातील ग्रामस्थांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी गृहराज्यमंत्री (शहरी) आ. योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर विधानसभा खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने धामणंद महालिंग मंदिर येथे महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी सदरील शिबिर दोन-तीन महिन्याने आयोजित केले जाईल. जेणेकरून सर्वसामान्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तसेच पोसरे बौद्धवाडी व आदिवासीवाडी पुनर्वसनाच्या प्रश्नांसंदर्भात येत्या आठ दिवसात मिटींगचे नियोजन केले जाईल, असे यावेळी सांगितले.
शिवसेना गुहागर विधानसभा मतदारसंघ खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्वांचे लाडके नेते, खंबीर नेतृत्व, तरुण तडफदार गृहराज्यमंत्री (शहरी) आ. योगेशदादा कदम यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवून मोठा विश्वास दाखवला आहे. ना. योगेशदादा कदम यांनी देखील दापोली- मंडणगड -खेड विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रलंबित विकास कामे मार्गी लावली आहेत. आता देखील ते मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यासह तरुण तडफदार गृहराज्यमंत्री (शहरी) ना. योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असून नेतृत्वाचा विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.
शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत या उपक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी पंधरागाव विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत अरविंद चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत.