( पाली / वार्ताहर )
चिपळूण तालुक्यातील नायशी गावचे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र नारायण घाग वय ८७ यांचे हृदय विकाराने १२ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्याच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस खात्यात रत्नागिरी जिल्हा, ठाणे, मुंबई याठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात मुलगे निवृत्त शिक्षक व शिवसेना चिपळूण उपतालुका प्रमुख किशोर घाग, प्राध्यापक राकेश घाग, रत्नागिरी पोलीस विभागातील सचिन घाग, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.