( रत्नागिरी /प्रतिनिधी )
हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर कला, वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फूर्तीनायिका, ज्ञानाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष रानमाळे म्हणाले की, महाराष्ट्रातील स्त्री स्त्री शिक्षणाच्या आरंभीच्या टप्प्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. समाजातील लोकांचा प्रखर विरोध सहन करून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केलीत. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग मोठा होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाजोद्धाराचे कार्य त्यांनी नेटाने सुरू ठेवले होते. हे कार्य सुरू ठेवण्याची जबाबदारी आज विद्यार्थी व शिक्षकांवर आहे. या कार्यक्रमा प्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.