(संगमेश्वर / एजाज पटेल)
कै.मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली या ठिकाणी नुकत्याच झालेल्या 17 वर्षे वयोगट मुलं-मुली पावसाळी मैदानी स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांनी खालील मैदानी खेळ प्रकारात लक्षणीय यश संपादन करून तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला आहे.
विविध खेळ प्रकारांचे निकाल पुढील प्रमाणे
1)कु:दिपाली प्रमोद शिंदे (3000 मीटर धावणे) पहिला क्रमांक, 2) कु.गार्गी विश्वास बाचीम(1500 मीटर धावणे) दुसरा क्रमांक, 3)कु. सिमरन समीर घेवडे(1500 मीटर धावणे) तिसरा क्रमांक, 4) कु.अनुष्का मंगेश भूवड(400 मीटर धावणे)पहिला क्रमांक, 5) कु.दिपाली प्रमोद शिंदे(400 मीटर धावणे) दुसरा क्रमांक, 6) कु.आकाश शैलेश शिगवण(400 मीटर धावणे)चौथा क्रमांक, 7) कु.पायल सूर्यकांत कांबळे(3 कि.मी. चालणे दुसरा क्रमांक), 8 )कु.श्रावणी अरविंद नितोरे(800 मीटर चालणे) पहिला क्रमांक, 9)कु.अश्विनी संदिप मांडवकर(800 मी चालणे)दुसरा क्रमांक, 10) कु.श्रुति बारगूडे(200 मीटर चालणे) चौथा क्रमांक, 11) कु.ओमकार श्रीपत घडश200 मी चालणे)तिसरा क्रमांक 12) कु.ओमकार श्रीपत घडशी(110 मीटर अडथळा शर्यत) पहिला क्रमांक, 13) कु. तन्वी संजय खोले(100 मीटर अडथळा)चौथा क्रमांक अशा प्रकारे यश संपदान करण्यात आले असून, 15 ऑक्टोबर रोजी डेरवण क्रीडा संकुल या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 8 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
तसेच कु. तन्वी वेद्रे, कु. सावली शिंदे, कु. ज्ञानदीप शितप, प्रणय मुंडेकर, ऋतिक काजरेकर, वेदांत थुळ, आकाश शिगवण , रुणाल माईंगडव अथर्व मोहिते या विद्यार्थ्यांनीही विविध स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली आहे.
या यशामुळे शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण असून, क्रीडा क्षेत्रातील या दैदीप्यमान कामगिरी बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल पाटील, संस्था अध्यक्ष श्री. चंदुभाई देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, सचिव श्री.दिलीपभाई कुळकर्णी,क्रीडा विभाग प्रमुख श्री. सुरेश रणदिवे, क्रीडा विभाग सहाय्यक श्री. निलेश घडशी व सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच फुणगूस खाडीभाग जनतेकडूनही सर्व खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांच्यावर प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वरून संदेशद्वारे अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. शाळेच्या क्रीडा विभागासाठी बक्षीसे देण्यासाठीसुद्धा काहींचे हात पुढे सरसावले असून राहुल कुलकर्णी तसेच डॉ. अरुण अशोक डिंगणकर यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस स्वरूपात देणगी दिली आहे.