( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या क्रिशा कपिल इंदानी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिची निवड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पैसा फंडच्या क्रिशा इंदानी हिने प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ” निसर्गाप्रती माझे कर्तव्य ” हा क्रिशा हिचा वक्तृत्व स्पर्धेसाठीचा विषय होता. क्रीशा हिची निवड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी झाली आहे.
क्रिशा इंदानी हिच्या या यशाबद्दल तिची प्राथमिक शिक्षिका असणारी आई श्रीमती अपर्णा दायमा , मार्गदर्शक शिक्षक विनोद ढोर्लेकर, सौ. स्वाती शिंदे यांचे व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले आहे. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते क्रिशा हिला नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
फोटो – क्रिशा इंदानी हिला सन्मानित करताना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी सोबत मार्गदर्शक शिक्षिका स्वाती शिंदे