(संगमेश्वर)
तालुक्याला पश्चिम महाराष्ट्रासोबत जोडण्यासाठी संगमेश्वर पाटण घाटमार्ग वरदान ठरणार असून या घाटमार्गामुळे संगमेश्वर बाजारपेठेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. या घाटमार्गासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम आग्रही असून येत्या पावसाळी अधिवेशनात या घाटमार्गाचा आवाज उठविणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.
या घाटमार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६,६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६,६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासन दरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचे समन्वयक संतोष येडगे यांनी सांगितले,
रस्त्यांच्या जाळ्यांमुळे दळण-वळण वाढणार
संगमेश्वर-घाटण मार्गामुळे रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. त्यामुळे दळण-वळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. कुठल्याही शहराचा विकास करायचा असेल तर दळण-वळणाच्या सोयी फारस महत्वाच्या आहेत. त्यामुळे रस्त्यांचे जाळे विकासाचा कणा असतो. या रस्त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राली कोकण कनेक्ट होणार आहे. त्यामुळे कोकणचा विकासाला हातभार लागणार आहे. त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया केला जाईल या आशावादाला आणखी बळकटी मिळणार आहे. राज्याचे वित्तमंत्री व बांधकाम मंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याने या रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.
तत्कालीन बांधकाम मंत्र्यांकडून पाच कोटींची तरतूद
संगमेश्वर पाटण पाटमार्ग डीपीआरसाठी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन खर्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआरसाठी तरतूद्र केलेल्या निधीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
“या” गावांना होणार फायदा…
संगमेश्वर पासून सुरु होणाऱ्या या पाटमार्गाचा कोसुब, करवेळे, वासी, पामणी तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग, विखली, तांबेडी, शेनवडे, शेबवणे, कहवई. कुंभारखाणी, कुचांचे, राजिवली. कुटगिरी, रातांबी, कोडीवरे, माखजन, करजुवे, असूर्डे, नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गौवळ, पाये, आदी आणि खाडीपहुंचातील, सहयाद्री संगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरिकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.