(राजापूर)
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यातच होणार असून सर्व रिफायनरी समर्थकांनी आश्र्वस्त रहावे, असे आवाहन सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक व शिवसेना नेते किरण उर्फ भय्या शेठ सामंत यांनी रिफायनरी प्रकल्प समर्थकांना केले. राजापूर तालुका रिफायनरी समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या सोबत भय्या शेठ सामंत यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी किरण सामंत यांनी विशेष मार्गदर्शन केले. राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न चालू ठेवू असेही किरण सामंत यावेळी म्हणाले. या बैठकीवेळी राजापूर तालुक्यातील सर्व रिफायनरी प्रकल्प समर्थक, समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, रिफायनरी समर्थक पुरुषोत्तम खांबल, विनायक कदम, ऐजाज बंगी, हुसैन मुंगी, निलेश पाटणकर, अविनाश महाजन, फारुख साखरकर, मन्सूर काझी, अद्वैत अभ्यंकर, संदेश आंबेकर, सुनील भणसारी, राजाराम गुरव, मनोज परांजपे, राजा काजवे, माजी नगरसेवक प्रकाश आमकर, अरविंद लांजेकर, संतोष चव्हाण, विद्याधर राणे, एकनाथ खांबल, जयंत कदम, अमर वारीसे, समीर शिंदे, हरिश्चंद्र शिर्के आदी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचलन सिद्धेश मराठे यांनी केले.