(राजकोट)
भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील तिस-या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इतिहास रचला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स पटकावण्याचा कारनामा केलाय. अश्विने राजकोट कसोटीच्या दुस-या दिवशी जैसी क्राऊलीला बाद करत हा विक्रम नावावर केला. अश्विनने झॅक क्राउलीला झेलबाद करून कसोटीतील ५०० विकेट पूर्ण केले. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी हा कारनामा केला होता.
रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकवणारा दुसरा भारतीय आहे. त्याने ९८ सामने खेळत हा विक्रम नावावर केला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान ५०० विकेट पटकावण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. त्यांनी ५०० विकेट पूर्ण करण्यासाठी केवळ ८७ सामने खेळले होते. तर भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी ५०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १०५ सामने खेळले होते. शेन वॉर्न यांना हा विक्रम नावावर करण्यासाठी १०८ सामने खेळावे लागले होते. त्यामुळे रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे.
रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये ५०० विकेट पटकावणारा ९ वा गोलंदाज ठरलाय. तर ५०० बळी पूर्ण करणारा तो ५ वा फिरकीपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त बळी मुरलीधरन यांच्या नावावर आहेत. त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट पटकावल्यात. त्यानंतर शेन वॉर्न यांच्या नावावर ७०८ विकेट्सची नोंद आहे. तर जेम्स अँडरसन याच्या नावावर ६९५ विकेट्स आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने १३२ कसोटीत ६१९ विकेट घेतल्या आहेत.
तमिळनाडूच्या या फिरकीपटूने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याने 24 पेक्षा कमी सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि आठ वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी 500 बळी घेणारे गोलंदाज
- अनिल कुंबळे – सामने: 131, विकेट्स: 619
- रविचंद्रन अश्विन – सामने: 98, विकेट्स: 500
जागतिक क्रिकेटमध्ये 500 कसोटी बळी घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन *(श्रीलंका) – विकेट – 800
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – विकेट्स 708
- जेम्स अँडरसन* (इंग्लंड) – विकेट्स 690
- अनिल कुंबळे (भारत)- 619 विकेट्स
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 604 विकेट्स
- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 विकेट्स
- कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519
- नॅथन लिऑन* (ऑस्ट्रेलिया) – विकेट्स 517
- रविचंद्रन अश्विन* (भारत) – 500 विकेट्स
भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. “कौटुंबिक वैद्यकीय कारणांमुळे रविचंद्रन अश्विनने कसोटी संघातून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचा अश्विनला पूर्ण पाठिंबा असेल”, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.