(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
हातखंबा ते रेल्वस्थानकापर्यंत एका बाजूची तुकड्यात मार्गिका तुकड्यात पूर्ण करण्यात आली आहे. हातखंबा भागात एकही मार्गिका पूर्ण झाली नसल्याने भल्या मोठ्या खड्ड्यामंधून रात्रीचा प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या दारातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रवी इफ्राबिल्ड् या ठेकेदार कंपनीने वाहनचालकांसह पादचार्यांचे प्रचंड हाल करत आहे. याकडे मात्र संबधित महामार्ग प्राधिकरण विभागाचे वेळोवेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ठेकेदार कंपनीवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर खेडशीपर्यंत कशीबशी एक मार्गिका अर्धवट स्थितीत आहे. तिथून पुढील रस्त्याची हालत अंत्यत खराब होऊन सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे. सिद्धाई हॉटेलच्या भागात पन्नास मीटरची काँक्रिटीकरणाची मार्गिका करून ते देखील काम अर्धवट स्थितीत काम आहे. महामार्गाचे सुरू असलेले काम होणार तरी कधी? असा सवाल वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
रस्त्यावरील खडीचा दुचाकीस्वारांना धोका
ठेकेदार कंपनीच्या मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कामाला वाहनचालक आता चांगलेच हैराण झाले आहेत. कारवांचीवाडी, खेडशी आदी ठिकाणी तुकड्यात केलेले काँक्रीटकरणाचे रस्ते ड्रायव्हरजनचे फलक उभारून सर्विस रोडला जोडण्यात आले आहे. मात्र जोडस्त्याच्या ठिकाणी मोठ्या दगडीचा भराव केला आहे यातून दुचाकी चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे.