(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा शाखा रत्नागिरी जिल्ह्याचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धम्म परिषदेसाठी रत्नागिरी शहरात धम्ममय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर बौद्ध धम्माचा पंचशील ध्वज लावण्यात आले आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. उन्हाचा कडाका वाढू लागल्याने दाखल होणाऱ्या बांधवांना मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या धम्म बांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हनून संस्थेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
शहरातील मारुती मंदिर ते प्रमोद महाजन क्रीडा संकुलपर्यंत धम्म ध्वज, डिजिटल बोर्ड स्वागत कमानी आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ भिमराव आंबेडकर यांचे कटाऊट तसेच भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. एकूणच संपुर्ण रत्नागिरी शहर बौद्धमय झालेले दिसून येत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने रत्नागिरीत 22 व 23 मार्च 2025 रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े. या धम्म परिषदेचे उद्घाटन व चर्चासत्र 22 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल सभागृह येथे होणार आहे. संध्याकाळी 6.30 ते 8 व़ा प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे भन्ते ए सुमेधबोधी यांची जाहीर धम्मदेसना होणार आह़े. तर 23 मार्च रोजी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे खुली धम्म परिषद होणार आह़े. कार्यक्रमाला ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ड़ॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन ॲड सुभाष जौंजाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे.
भिक्खू संघाची धम्म रॅली
23 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 व़ा शहरातील ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्याठिकाणाहून प्रमोद महाजन क्रीडा संकूल मैदान अशी भिक्खू संघाची धम्म रॅली, प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथील धम्मपरिषदच्या ठिकाणी सकाळी 11 व़ा आदर्शांच्या प्रमिमांना अभिवादन, भन्ते ए सुमेधबोधी यांचेकडून त्रिसरण पंचशील ग्रहण व मान्यवरांचे स्वागत व सत्कार, प्रमुख मार्गदर्शक व पुज्य भन्ते ए सुमेधबोधी यांची धम्मदेसना दुपारी 3 व़ा भोजनदान असे आयोजन करण्यात आले आह़े. धम्मपरिषदेसाठी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस़ के भंडारे, राष्ट़ीय उपाध्यक्ष ॲड. एस़ एस वानखेडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार, राष्ट़ीय सचिव ब़ी एच़ गायकवाड, भिकाजी कांबळे, य़ु जी बोराडे, प्रशांत गडकरी, जयवंत लव्हांडे आदी उपस्थित राहणार आहेत़.