(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास् रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी तालुका लांजा येथे संपन्न झाली. पदोन्नती, पदोन्नतीतील आरक्षण, अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समायोजन, संस्था व शिक्षण विभागाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा, २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ होय. तसेच संघटना म्हणजे आपलं संरक्षण आणि जीवदान देणारी व्यवस्था असल्याने प्रत्येकाने संघटनेत सहभागी होणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण विचार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कांबळे यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना पटवून सांगितला.
रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना संघटनेविषयी अधिक माहिती दिली. या जिल्हा संघटनेच्या सभेसाठी कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष भालशंकर, कार्याध्यक्ष श्री. राजेश कांबळे, सचिव श्री.प्रकाश पांढरे, उपाध्यक्ष श्री. विनोद सांगावकर, उपाध्यक्ष श्री. भारत कांबळे, उपाध्यक्ष श्री. रशिद तडवी तसेच रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. एस्. के. जाधव, लांजा तालुकाध्यक्ष श्री. संतोष कांबळे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. अमोल सरनोबत आणि राजापूर तालुकाध्यक्ष श्री. भालशंकर, रमेश कांबळे, दिपक गमरे तसेच तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शिरीष भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली लांजा तालुक्यातील पदाधिकारी व सदस्यांनी ही सभा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.