(रत्नागिरी)
को ऑपरेटिव्ह बँकस् एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनादिनानिमित्त युनियनचे अध्यक्ष मा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, शिवसेना नेते मा. खा. आनंदरावजी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंतर सहकारी बँक क्रिकेट स्पर्धा दि.१०/०२/२०२४ ते ११/०२/२०२४ रोजी पुरंदरे स्टेडियम, नायगांव, मुंबई येथे खेळविण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघानी सहभाग घेतला होता. सदरील स्पर्धेचा अंतिम सामना हिंदुस्थान बँक व रत्नागिरी जिल्हा बँकेध्ये झाला. सदरील स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेने उपविजतेपद पटकाविले आहे.
यापूर्वी सन २०१६ मध्ये झालेल्या शिवाजी पार्क, मुंबई येथे झालेल्या किक्रेट स्पर्धेतही रत्नागिरी जिल्हा बँकेने अंतिम विजेतेपदही पटकाविले होते. त्यामुळे यावर्षीही किक्रेट स्पर्धमध्ये उपविजेतेपद पटकाविल्याने सर्व खेळांडूचे व संघ व्यवस्थापनाचे सर्व स्तरारावरुन अभिनंदन करणेत येत असून रत्नागिरी युनियनचे जनरल सेक्रेटरी श्री. जितेंद्र साळवी, श्री. नरेश कदम, श्री.दिलीप लाड, श्री. रविकांत शिंदे, सौ. सिध्दी सावंत व सर्व मा. कार्यकारिणी व युनिट समिती सदस्य यांनी विशेष कौतुक केले आहे.
सदरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून रत्नागिरी जिल्हा बँकेचा रुपेश जाधव याला गौरविण्यात येवून रत्नागिरी जिल्हा बँकेला आकर्षक चषक व पारितोषिक देवून सन्मानित करणेत आले. सदर स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाचे वेळी युनियनचे अध्यक्ष मा. खा. आनंदरावजी अडसूळ, युनियनचे सल्लागार मा. कॅप्टन अभिजित अडसूळ, कार्याध्यक्ष मा. सुनिल साळवी, श्री. दरेकर, श्री. जनार्दन मोरे व युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.