हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्री उद्या 8 मार्च 2024 रोजी शुक्रवारी येत आहे. या दिवशी व्रत पाळण्याने व यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे. असा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होत आहे, ज्यामुळे काही राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल, असे मानले जात आहे.
असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त भक्तीभावाने व्रत पाळतात आणि शिव-गौरीची पूजा विधीपूर्वक करतात. या दिवशी शिवभक्त शिवलिंगावर बेल-पान वगैरे अर्पण करून पूजा, उपवास करतात आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात.
300 वर्षांनंतर “त्रिकोणी” चा दुर्मिळ योग
असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान भोलेनाथ विराजमान असतात, त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शंकरजींची पूजा अनेक पटींनी अधिक फळ देते. जोतिषशात्रानुसार 8 मार्च रोजी ग्रहांचा शुभ संयोग आणि शिवयोगाचा सर्वार्थसिद्धी योग असताना महाशिवरात्री हा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जाते, कारण या दिवशी शुक्र प्रदोष व्रताचा योगायोग आहे. या दिवशी प्रदोष व्रत व्यतिरिक्त इतर अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत. अशा परिस्थितीत यावेळी महाशिवरात्रीचे व्रत करून भगवान भोलेनाथाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा विश्वास आहे. वर्षात येणाऱ्या 12 शिवरात्रींपैकी महाशिवरात्रीचे वेगळे महत्त्व आहे.
- कॅलेंडरच्या गणनेनुसार आणि धार्मिक श्रद्धेनुसार, या प्रकारचा योगिक संयोग आणि ग्रहस्थिती 300 वर्षांत फक्त एक किंवा दोनदा महाशिवरात्रीला येते. या दुर्लभ योगामध्ये भगवान शंकराची उपासना लवकर फळ देणारी मानली जाते. महाशिवरात्रीला, शुक्रवारी, श्रावण नक्षत्रानंतर, धनिष्ठा नक्षत्र, शिवयोग, गर करण आणि मकर/कुंभ राशीचा चंद्र दिसेल. त्याच वेळी, कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि बुध यांचा संयोग होईल. या प्रकारचा योग तीन शतकांत एकदा किंवा दोनदा तयार होतो, जेव्हा नक्षत्र, योग आणि ग्रहांची स्थिती मध्य त्रिकोणाशी संबंधित असते. यावेळी तब्बल 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला हा त्रिकोणी योग तयार होणार आहे. या दुर्लभ योग आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फल प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे शुभ असते. शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. पती-पत्नीने मिळून शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केल्यास त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
- शुभ संयोग आणि शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची पूजा केल्याने त्यांच्या भक्तांना अपेक्षित फळ मिळते. या दिवशी पहाटेपासूनच शिवभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी होते. सर्व भक्त भगवंताच्या पूजेत गुंतून जातात. अनेकजण या दिवशी आपल्या घरी रुद्राभिषेकही करतात. भगवान भोलेनाथ यांची अनेक प्रकारे पूजा केली जाते. मात्र महाशिवरात्रीला भाविकांनी बेलपत्रासह शंकरजींची विशेष पूजा केल्यास त्यांची आर्थिक समस्या दूर होते.
- पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 08 मार्चच्या रात्री 09:47 पासून सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी 06:17 वाजता संपेल. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी, निशिता काळात शंकरजींची पूजा केली जाते, म्हणून या वर्षी शुक्रवार 08 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार आहे. शिवयोग 8 मार्च 2024 रोजी पहाटे 4:46 वाजता सुरू होईल आणि 9 मार्च 2024 रोजी सकाळी 12:46 वाजता समाप्त होईल. शंकरजींशी संबंधित हा योग शिवरात्रीच्या सणावर तयार होत आहे जो महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. असे या योगामध्ये मानले जाते. हा योग भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
- सिद्ध योग 9 मार्च 2024 रोजी दुपारी 12:46 पासून सुरू होईल आणि रात्री 8:32 पर्यंत राहील. हा योग सिद्धी प्राप्तीसाठी शुभ मानला जातो. यासोबतच निशिता काल मुहूर्तावर हा योग येत आहे. या काळात शंकरजींची आराधना केल्याने तुमची उपासना सफल मानली जाईल.
- सर्वार्थ सिद्धी योग हा 8 मार्च 2024 रोजी सकाळी 6:38 पासून सुरू होईल आणि 10:41 मिनिटांपर्यंत राहील. हा योग कार्ये पूर्ण करण्यास आणि त्यात यश मिळवून देण्यास मदत करतो. अशा स्थितीत शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात मानसन्मान मिळेल, असे मानले जाते .
- महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्र असल्यामुळे हा दिवस अधिक शुभ झाला आहे. श्रावण नक्षत्राचा स्वामी शनिदेव मानला जातो, जो शंकरजींचा परम भक्त आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी श्रावण नक्षत्र आल्याने हे व्रत अधिकच फलदायी झाले आहे. श्रावण नक्षत्रात शंकरजींची आराधना केल्याने तुम्हाला भगवान शिवाच्या आशीर्वादाचे फायदे लवकरच पाहायला मिळतात.
पूजेची शुभ वेळ
- पहिली प्रहार पूजा – 8 मार्च संध्याकाळी 06.25 ते 09.28 पर्यंत
- दुसरी प्रहार पूजा – 8 मार्च रात्री 9.28 ते 9 मार्च मध्यरात्री 12.31
- तिसरी प्रहार पूजा – 9 मार्च मध्यरात्री 12.31 ते पहाटे 3.34
- चतुर्थ प्रहार पूजा – 9 मार्च रोजी सकाळी 03.34 ते 06.37 पर्यंत
महाशिवरात्रीच्या पूजेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
1. सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून कपाळावर भस्म किंवा चंदन लावून त्रिपुंड बनवा. रुद्राक्ष धारण करा.
2. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान, महादेवाच्या या आठ नावांचे स्मरण करून नमस्कार करावा. संपूर्ण दिवस ऊं नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
3. सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या रात्रीच्या चारही तासांत पूजा करण्याची पद्धत शिवपुराणात सांगितली आहे. संध्याकाळी स्नान करून शिवमंदिरात जावे.
4. मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शिवलिंगाला दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्पण करा.
5. पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करा. शिवलिंगावर फळे, फुले, चंदन, बिल्वपत्र आणि धोत्रा अर्पण करा.
महाशिवरात्रीची पूजा करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. कुंद, केतकीची फुले भगवान शंकराला अर्पण करू नयेत. पूजेनंतर शिवलिंगाची अर्धीच परिक्रमा करावी.
Also Read : भावार्थ दासबोध – भाग 137 दशक नऊ समास हा सात विकल्प निरसन नाम समास
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1