(राजापूर / वार्ताहर)
आगामी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस हद्दीत 267 राजापूर विधानसभा मतदार संघातील वाटुळ बाजारपेठ येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धंनजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च घेण्यात आला.
यावेळी राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, राजापूर पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख, राजापूर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव परब, पोलीस अंमलदार सचिन वीर, अनंत तिवरेकर यांसह दहा पोलीस अंमलदार पोलीस केंद्रीय राखीव सुरक्षा बल चे सब इन्स्पेक्टर मोहमद शोएब, असिस्टंट सब इन्स्पेक्टर सोमनाथ बनिक आणि 48 जवान यात सहभागी झाले होते.