(रत्नागिरी)
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची सोमवारी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार तास चौकशी केली. आरोपी म्हणून रजिस्टरवर स्वाक्षरी करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
अवैध मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांच्या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूरही केला. हा अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर होते.
राजन साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण यावेळी हजर होते. सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. मात्र, केवळ अनुजा साळवी यांचाच जबाब घेण्यात आला. उर्वरित लोकांची चौकशी आज मंगळवारी होणार आहे. चौकशीदरम्यान अनुजा साळवी यांनी रजिस्टरवर सही केली. मात्र, आरोपी म्हणून ही स्वाक्षरी करताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यामुळे साळवी यांच्या उपस्थित सहकाऱ्यांनाही गहिवरुन आले.
Also Read : जलजीवन मिशनच्या कामातील तक्रारीवर कार्यवाहीबाबत कोकण आयुक्तांनी दिल्या सूचना
Visit us on Google News :https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1
Join Us : https://www.facebook.com/Ratnagiri24News