(मुंबई)
भारतीय रेल्वेने प्रवाशांची गरज ओळखून सुपर अॅप SwaRail हे नवे अॅप लॉन्च केले आहे. हे ऑल-इन-वन अॅप आहे. हे प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवांचा लाभ देते. याच्या मदतीने तुम्ही आरक्षण आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकाल.
या SwaRail अॅपद्वारे तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि PNR ची ही माहिती मिळू शकणार आहे. या अॅपमधून तुम्ही रेल्वेची हवी ती सेवा घेऊ शकता. रेल्वेने सर्वसामान्यांना पुरविलेल्या सर्व सेवा या अॅपवर प्रवाशांना मिळणार आहेत. भारतीय रेल्वेचे हे नवे सुपर अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सने (CRIS) विकसित केले असून सध्या प्ले स्टोअरवर बीटा प्रोग्राममध्ये आहे.
रेल्वेचे हे सुपर अॅप सध्या विविध अॅप्सवरून उपलब्ध असलेल्या सर्व सेवा देण्याचे काम करेल. याच्या मदतीने तुम्ही आरक्षण आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकाल. मात्र, या अॅपनंतर IRCTC अॅप बंद होणार आहे किंवा ते सुरूच राहणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या’ सुविधा मिळणार
- आरक्षण तिकिट बुकिंग
- अनारक्षित तिकिटे
- प्लॅटफॉर्म तिकीट
- पार्सल बुकिंग
- PNR माहिती
- अन्न ऑर्डर आणि तक्रारी इ.
मदतीसाठी ट्रॅव्हल असिस्टंट उपलब्ध
रेल्वेच्या या नव्या सुपर अॅपअंतर्गत युजर्सना ट्रॅव्हल असिस्टंट फीचरही मिळणार आहे. यामध्ये सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा मिळणार आहेत. युजर्सला वेगवेगळ्या अॅप्ससाठी वेगवेगळे लॉगिन आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. साध्या साइन इनच्या मदतीने प्रवाशांना सहज लॉग इन करता येणार आहे. नवीन युजर्सना सुरुवातीला काही महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
‘स्वरल’ अॅपचे वैशिष्ट्य
‘स्वरल’ अॅपचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ट्रेन धावण्याचा वेळ, वेळापत्रक आणि कोचची स्थिती यासारखी माहिती देखील त्यात उपलब्ध असेल. यासोबतच, प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील मिळेल, जेणेकरून त्यांना प्रवासादरम्यान जेवणाची काळजी घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अॅपवरील ‘रेल मदत’ वैशिष्ट्याद्वारे, प्रवासी रेल्वेशी संबंधित तक्रारी नोंदवू शकतात आणि त्यांची स्थिती देखील ट्रॅक करू शकतात.
अॅप कसे वापरावे?
- ‘स्वरेल’ अॅप वापरण्यास खूप सोपे आहे. यासाठी प्रवाशांना एकदा नोंदणी करावी लागेल.
- साइन-अप करताना मोबाईल नंबर, वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरता येईल.
- एकदा साइन अप केल्यानंतर, हे अॅप आयआरसीटीसी रेलकनेक्ट आणि यूटीएस मोबाईल अॅप सारख्या इतर भारतीय रेल्वे अॅप्सवर देखील वापरले जाऊ शकते.
सध्या याची बीटा टेस्टिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्रॉईड आणि अॅप स्टोअरवरील बीटा टेस्टिंग स्लॉट फुल्ल झाले आहेत. मात्र हे स्टेबल व्हर्जनमध्ये किती दिवस लॉन्च केले जाईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.