लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव शनिवार २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या, या देवीच्या जत्रेत भाविकांची खूप गर्दी बघायला मिळते. दरवर्षी लाखो भाविक मोठ्या उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी येतात. यात सामान्य नागरिकांपासून अनेक प्रथितयश कलाकार आणि राजकारणी मंडळी हमखास भेट देतात. अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात जातात. यादरम्यान कोकणात विशेष गाड्याही सोडल्या जातात.
आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी यादरम्यान कोकणात जाणाऱ्या विशेष गाडीची व्यवस्था केली आहे. कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी या जत्रेसाठी एक विशेष गाडी ट्रेन डिमांड तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे