( राजापूर / तुषार पाचलकर )
नुकत्याच झालेल्या बदलापूर येथील निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी समजणारी पाचल बाजारपेठ येथे महाविकास आघाडी तसेच पाचल पंचक्रोशीतील जागृत नागरिकांनी जाहीर निषेध केला. अश्या घटना दाबून टाकणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध, फाशी द्या फाशी द्या नराधमला फाशी द्या, पाचल पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने निंदनीय घटनेचा जाहीर निषेध अश्या प्रकारच्या घोषणा देऊन आंदोलकांनी बाजारपेठेतील परिसर दणाणून सोडला होता.
पाचल बाजारपेठेत सकाळी 10 वाजता काळी फीत लावून झालेल्या घटनेच्या विरोधात घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राजापूर तालुका काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किशोरभाई नारकर, शिवसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सक्रे, काँग्रेस चे युवा कार्यकर्ते विनायक सक्रे,राजू लब्दे, अशोक गंगाराम सक्रे,शिवसेनेचे तालुका युवाधिकारी सुरेश ऐनारकार, पाचल विभाग अधिकारी संदीप बारस्कर, श्रीम शशिताई देवरुखकर, मोहनकाका नारकर, उपविभाग प्रमुख अफझल पाटणकर, तालुका अध्यक्ष विलास नारकर, सुरेश साळवी राष्ट्रवादी चे सुनील जाधव,पाचल प्रसिद्ध व्यापारी बाळा पाथरे सह शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.