(चिपळूण)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाची चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आज चिपळुणात मोठ्या उत्साहात झाली. या बैठकीच्या निमित्ताने चिपळूण तालुक्यातील सती-चिंचघरी आणि चिंचघरी बौद्धवाडीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
चिपळुणात प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभागृहात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाची चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला पक्षाचे निरीक्षक बबनराव कनावजे, माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम, नेते प्रशांत यादव, ज्येष्ठ नेत्या नलिनीताई भुवड, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, महिला जिल्हाध्यक्ष दिपिका कोतवडेकर, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष दाभोळकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अब्बास जबले, संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष बाबा साळवी, चिपळूणचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, संगमेश्वरच्या महिला तालुकाध्यक्ष दिपिका किर्वे, चिपळूणच्या शहराध्यक्ष डॉ. रहमत जबले, देवरुखचे शहराध्यक्ष नीलेश भुवड, चिपळूणचे शहराध्यक्ष रतन पवार, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी आदी व्यासपीठावर होते. तसेच या बैठकीला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व विविध सेल आणि फ्रंटलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करून आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.