शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सुमारे दोन हजार शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी विराट आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. भरपावसात शिक्षकांनी मोर्चात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
शहरातील माळनाका येथून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शिक्षकांच्या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जोरदार कोसळणाऱ्या पावसातच हातात छत्र्या घेऊन, रेनकोट घालून शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेला शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा, दि. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, शिक्षणसेवक पद रद्द करा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करा, राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी, अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शैक्षणिक, अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेक विविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहिस्थ संस्थांच्या परीक्षा ऑनलाइन माहिती, माहितीची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबविण्यात यावीत, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !