( राजापूर / तुषार पाचलकर )
येथील पोलीस ठाण्याच्या गोपनिय विभागात नाईक हवालदा म्हणून कार्यरत असलेले सचिन वीर यांना हेडकाँस्टेबल पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
तेरा वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात पोलीस दलात रुजू झालेल्या वीर यांनी रत्नागिरी, जयगड,राजापूर अशा विविध पोलिस ठाण्यात व तालुक्यातून आपल्या प्रामाणिक व मनमिळावू स्वभावाने कर्तव्याचा ठसा उमठविला आहे. गोपनिय विभागात कर्तव्य बजावत असताना किंवा एखाद्या गुन्ह्याची उकल करताना वरिष्ठांच्या सहकार्याने दोन्ही बाजूनी तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेत अतिशय गुंतागुतीची गुन्ह्याची प्रकरणे त्यांनी मोठ्या कसोशीने हातळलेली आहे.याच त्याच्या कामगिरीची पोलीस प्रशासनाने दखल घेत वीर यांची हेडकाँस्टेबल पदी बढती दिली आहे.वीर यांना बढती मिळाल्याबद्दल राजापूर पोलीस ठाण्याच्यावतीने पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी पोलीस उपनिरिक्षक वासुदेव परब, पोलीस हवालदार दीपक करजवकर, शैला लांबोर, हर्षदा चव्हाण, ममता नामये, विश्वास बाणे, महेश जगताप सुषमा स्वामी आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.