(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा रत्नागिरी चे वतीने दोन दिवसापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेतली होती. या भेटीत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांची रखडलेली पदोनत्ती बाबत चर्चा करण्यात आली होती.
जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे आणि होणारी पदोन्नती याचा समतोल राखला जाऊन दोन दिवसात पदोन्नती च्या ऑर्डर केल्या जाईल असे आश्वासन संघटनेला दिले होते. त्याप्रमाणे आरोग्य सेवक मधून आरोग्य सहाय्यक पदी 11 कर्मचाऱ्यांचे तर आरोग्य सेविका मधून आरोग्य सहाय्यिका पदी 26 कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. तसे आदेश काल निर्गमित करण्यात आले.
आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्यामुळे जिल्हाध्यक्ष डॉ.परशुराम निवेंडकर यांनी आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.