(रत्नागिरी)
राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धा उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातून १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले. यातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती अॅवॉर्ड विजेत्या शिल्पा जोशी, शिवछत्रपती अॅवॉर्ड विजेत्या श्रुती कानडे-जोशी व राष्ट्रीय टेबलटेनिस खेळाडू आशा चव्हाण यांच्या एसएएस स्पोर्टसने या स्पर्धेचे नेटके आयोजन केले. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वेटरन्स टेबल टेनिस कमिटी, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व ओम साई स्पोर्टस् अॅकॅडमीच्या सहकार्याने ही स्पर्धा रंगतदार झाली. या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस वेटरन्सचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक, उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- ३९ वर्षांवरील पुरुष गट- विजयी ओंकार जोग (पुणे), उपविजयी संतोष वाक्रडकर, ४९ वर्षांवरील- विवेक अलवाणी (पुणे), प्रसाद नाईक (एमसीडी), ५९ वर्षांवरील- कपिल कुमार (टीएसटीटीए), प्रदीप गुप्ता (पुणे), ६४ वर्षांवरील- जयंत कुलकर्णी (एमसीडी), जितू मालवणी (मुंबई उपनगर), ७० वर्षांवरील- शिवानंद कुंदजे (नाशिक), सुहास दांडेकर (एमसीडी), ७४ वर्षांवरील- विजयी पिनाकिन संपत, उपविजयी विकास सातारकर, तृतीय सतीश शिरसाठ व रविंद्र बोरकर. महिला- ३९ वर्षांवरील- विजयी श्रुती कानडे- जोशी (ठाणे), उपविजयी स्नेहा भोळे (नागपूर), ४९ वर्षांवरील- विजयी- अनघा जोशी, उपविजयी मूनमून मुखर्जी, ६० वर्षांवरील- विजयी नीता कुलकर्णी, उपविजयी रोहिणी अलवार, तृतीय- नूतन ढिकळे, ६५ वर्षांवरील- विजयी- रंजना पत्की, उपविजयी ज्योती कुलकर्णी, तृतीय- दीपा जैन व अनुराधा वराडकर, ६९ वर्षांवरील- विजयी- मनिषा बोडस, उपविजयी शीला भैरमवार, तृतीय ज्योत्स्ना पटवर्धन. पुरुष टीम इव्हेंट- ५९ वर्षांवरील- विजयी फोर्झा, उपविजयी टीम कूल. टीम स्मार्ट- विजयी टॉस अॅकॅडमी अ, उपविजयी क्लेव्हर मास्टर्स.
फोटो :
राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेतील विजेत्या श्रुती कानडे-जोशी यांना बक्षीस देताना राजीव बोडस व सौ. स्मिता बोडस आणि आनंद जोशी.
दुसऱ्या छायाचित्रात ओंकार जोग यांना बक्षीस देताना सौ. स्मिता बोडस, राजीव बोडस व आनंद जोशी