( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासन राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदे तर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेले दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी तालुकास्तरीय विज्ञान विषयात मुख्याध्यापक प्रदीप जाधव ( भोके, आंबेकरवाडी शाळा) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र शासन राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदे तर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेले दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर पुणे येथे स्पर्धेचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा ३० सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे केंद्रीय सहसचिव अर्चना शर्मा-अवस्थी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
राज्यातील ३६ जिल्ह्यातून एकूण १८,२२० व्हिडीओ प्राप्त झाले आहेत. या व्हिडीओंचे तालुका व जिल्हास्तर मुल्यांकन करण्यात आले. या स्पर्धेत रत्नागिरी तालुकास्तरावर इयत्ता सहावी व आठवीच्या गटामधील विज्ञान विषयात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबेकरवाडी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप जाधव यांनी तयार केलेल्या दर्जेदार व्हिडिओला रत्नागिरी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनी तयार केलेला व्हिडिओ हा विज्ञान विषयासंबंधित होता. स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक मिळाल्याबद्दल भोके आंबेकरवाडी शाळेचे नाव उचवणाऱ्या मुख्याध्यापक जाधव यांचे सर्व स्तरावरून कौतुक, अभिनंदन केले जात आहे.
थोडक्यात परिचय
प्रदीप जाधव हे तज्ञ मार्गदर्शक व उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रशालेत कामकाज करत असताना विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवत आहेत. गतवर्षी शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच शिक्षकांना शैक्षणिक उपक्रमात मार्गदर्शन, तंत्रज्ञानाच्या व ऑनलाईन कामाच्या क्षेत्रात मदत करणे, अशा विविध उपक्रमात ते सहभाग नोंदवत असतात.
📍 शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल
तालुका स्तरावरील निकाल
https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListB.aspx
जिल्हा स्तरावरील निकाल
https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListD.aspx