( मुंबई )
पोलिस खात्यातील उल्लेखनीय कार्यासाठी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदके जाहीर करण्यात आली. राज्यातील ३ पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ तर १७ पोलिस अधिका-यांना आणि कर्मचा-यांना ‘पोलिस शौर्य पदक’ आणि ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलिस पदक’ असे एकूण ५९ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत.
विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’मध्ये राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, संचालक राजेंद्र बालाजीराव डहाळे, सहायक पोलिस आयुक्त सतीश राघवीर गोवेकर यांचा समावेश आहे. राज्यातील १७ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. पोलिस शौर्य पदकांत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल शंकर सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक रंभाजी आवटे, पोलिस उपनिरीक्षक (मरणोत्तर) कै. धनाजी तानाजी होनमाने, नाईक पोलिस शिपाई नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना, पोलिस शिपाई शकील युसुफ शेख, पोलिस शिपाई विश्वनाथ सामैय्या पेंदाम, विवेक मानकू नरोटे, मोरेश्वर नामदेव पोटावी, कैलाश चुंगा कुलमेथ, कोटला बोटू कोरामी, कोरके सन्नी वेलादी, महादेव विष्णू वानखेडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज मिलिंद तारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल नामदेवराव देव्हाडे, पोलिस उपनिरीक्षक विजय दादासो सकपाळ, मुख्य शिपाई महेश बोरू मिच्छा, पोलिस शिपाई समय्या लिंगय्या आसाम यांचा समावेश आहे.
यासोबतच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलिस पदक’ राज्यातल्या ३९ पोलिसांना जाहीर झाली आहेत. यामध्ये – दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक, सदानंद जनाबा राणे- निरीक्षक, विजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे- पनिरीक्षक,अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक,शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक,बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई,अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक, संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.