( राजापूर / तुषार पाचलकर )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेर्ले गावची आणि अनेक वर्षांपासून पाचल येथे वास्तव्य असलेले पाचल गावचे डॉक्टर राजाराम जाधव यांची सुकन्या प्राची जाधव हिने फिजिओलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याने परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्राची राजाराम जाधव हिचे मुळ गावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेर्ले असून तिचे आजी आजोबा यांचेपासून अनेक वर्षांपासून तिचे बालपण, वास्तव्य राजापूर तालुक्यातील पाचल या गावी असल्याने प्राचीचे प्राथमिक शिक्षण पाचल येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन शासकीय कोट्यातून सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेज मधून बी. एम.एस. पूर्ण केले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र करक-कारवली येथे काही काळ वैद्यकीय सेवा केली. कोरोना काळात प्राचीने लांजा तालुक्यातील भांबेड येथे एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणूनही कामकाज पहिले होते.
नुकतेच तिने पिजी-नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय कोट्यातून येरला मेडिकल कॉलेज खारघर- नवी मुंबई येथून एमडी फिजिओलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. भविष्यात मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून गरजूना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना डॉ. प्राची जाधव हिने यावेळी व्यक्त केली आहे.