(संगमेश्वर / एजाज पटेल)
भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती अद्यावत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी याकरिता देशाच्या देदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी नवजीवन विद्यालय फुणगूस च्या विध्यार्थ्यानी स्वातंत्र्याची 75 वर्षपूर्ती निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या महाराष्ट्र शासनाच्या 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा , घर घर तिरंगा ‘ संकल्पा अंतर्गत सकाळी शाळेतून सर्व विध्यार्थ्यानी प्रभात फेरी काढली. शाळेतून निघालेली प्रभात फेरी जुनी बाजारपेठ,डिंगणी -फुणगुस पूल, ग्रामपंचायत रोड आदी तसेच सर्वजनिक ठिकाणाहून प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शाळा मुख्याध्यापक सुनिल पाटील सर, रणदिवे सर, मंदार भागवत सर, मंदार बापट सर, घडशी सर, हेमा कारंडे मॅडम, देवकाते मॅडम व पालक सहभागी होते. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज व क्रांतिकारकांची नावे व घोषवाक्य लिहिलेले फलक होते. सोबत भारत माता की जय, जय जवान जय किसान यासह विविध देश भक्तीपर आधारित घोषणा तसेच प्रभारफेरीत ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पाणी, संदेसे जाते हैं, आदी देशभक्तीपर गीतांनी वातावरण भक्तीमय केले होते. या घोषणा व भक्तीमय गीतांनी फुणगूस परिसर दुमदुमून गेला होता.