(संगमेश्वर)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, देवरुख यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत संगमेश्वर रामपेठ येथे पोषण अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक शेरे, ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा शेरे, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत कांबळे, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल योगिता बरगाळे, पोलिस हवालदार सचिन कामेरकर, महिला पोलिस अंमलदार गुंजन माईन, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वंदना यादव उपस्थित होते. विशेष कार्यकारी अधिकारी अंजली कोळवणकर, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, घे भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रिया सावंत, बचतगट बँक सखी सानिका कदम, CRP मनाली सुर्वे, सदस्य नयना शेट्ये आणि सदस्य सुप्रिया कदम हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्या प्रतिक्षा शेरे, बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना यादव व सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. I.C.D.S. प्रकल्प अधिकारी वंदना यादव यांनी प्रास्ताविक केले. I.C.D.S. पर्यवेक्षिका अमृता नरोटे, प्रेरणा रावणांक यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात अंगणवाडी नायरी बिटच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच बुरंबी बिटच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच संगमेश्वरच्या आशा सेविका उपस्थित होत्या. बहुसंख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच ग्रामस्थ, पालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात पोषण रॅली, रांगोळी स्पर्धा, डोहाळे जेवण, HB तपासणी, अर्धवार्षिक वाढदिवस, पाककला स्पर्धा यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. HB तपासणीसाठी आर.एच. मधून पूजा मोरे उपस्थित होत्या. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री.चंद्रकांत कांबळे व पोलिस हवालदार सचिन कामेरकर यांनी उपस्थित महिलांना सायबर क्राईम, मोबाईलपासूनचे फायदे व तोटे तसेच पुढे येणारा नवरात्र उत्सव कालावधित भजनाचा व नृत्याचा आनंद लुटावा व कायदा व सुव्यवस्था पाळावी असे मोलाचे मार्गदर्शन करताना नागरिकांना आवाहन केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री घडशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेरणा रावणांक यांनी केले. कार्यक्रम केंद्र शाळा संगमेश्वर नं. २ (रामपेठ) येथील हॉलमध्ये पार पडला.